Tecnologia News: आजपासून पबजी पूर्णपणे बंद होणार

एमपीसी न्यज   : भारतात आजपासून पबजी मोबाईल(PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाइट(PUBG Mobile Lite) पूर्णपणे बंद होणार असल्याने माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे पबजी खेळणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. एक महिन्यापूर्वी देशात ११८ अँप्सवर बंदी आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यात बहुचर्चित पबजी एप्सवरही बंदी आणली होती.

चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारताने चीनी एप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, वापरकर्त्याच्या डेटाचे संरक्षण करणे नेहमीच प्रथम प्राधान्य दिले गेले आहे आणि आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व वापरकर्त्यांची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. आम्ही या निर्णयाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि भारतातील पबजी मोबाइलसाठी दिलेलं समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे.

जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटवर कोरोना लॉकडाऊन काळात युजर्सची संख्या वाढल्यानंतर यावर बंदी आणली गेली. पबजी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता. भारतात या एप्सवर बंदी आणल्यानंतर चीनच्या या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अब्ज डॉलरने(२,४८,००० रुपये) घसरला. टेन्सेन्ट PUBG APP च्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होती. दररोज या कंपनीला तब्बल ३ कोटी एक्टिव्ह युजर्स जोडले जात होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.