Tecnologia News : पबजी पुन्हा येणार, पालकांची डोकेदुखी वाढणार

एमपीसी न्यूज : पबजी मोबाईल भारतात परत येणार आहे. दक्षिण कोरियन कंपनी पबजी कॉर्पोरेशननं यासंदर्भात घोषणा केली आहे. भारतीय बाजाराचा विचार करून नवा गेम घेऊन येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.

भारतात पुन्हा येणाऱ्या पबजीमध्ये चिनी कंपनीची कोणतीही भागिदारी नसणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती पबजी कॉर्पोरेशननं दिली.

भारत-चीन या दोन्ही देशांत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अनेक चीनी appsवर भारतात बंदी आणली होती. यातीलच भारतातील एक लोकप्रिय गेम appमध्ये PUBG समावेश होतो.

भारतातील बहुतांश तरुणाईला या गेम appने भुरळ पाडली होती. PUBG Mobile बॅन करण्याआधी भारतात जवळपास 5 कोटी इतके अॅक्टीव्ह युझर्स होते. PUBG Mobile साठी भारत हे सर्वांत मोठे मार्केट होते यात शंका नाही. मात्र, त्यावर अचानक बंदी आणली गेल्याने अनेकांना दु:ख झालं होतं. मात्र, आता PUBG पुन्हा एकदा परत येणार असल्याची बातमी समोर येत आहे.

भारताने चीनलाच रणनीतींद्वारे कोंडीत पकडण्यासाठी चीनचे अनेक apps बंद केले होते. चीनी कंपनी Tencent ला भारतातील सर्व्हर बंद करावे लागले होते. त्यामुळे, हा गेम भारतातल्या युझर्सना खेळता येत नव्हता. मात्र, एका रिपोर्टनुसार PUBG Mobile हा खेळ पुन्हा एकदा भारतात दाखल होऊ शकतो. टेक क्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, कोरियन कंपनीच्या सुत्रांनी ही माहीती दिली आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा PUBG Mobile भारतात परतू शकतो. रिपोर्टनुसार, PUBG Mobile ही मूळची कोरीयन कंपनी आहे. ती सध्या जागतिक क्लाऊड सर्व्हीस प्रोव्हायडरची चर्चा करत आहे. या चर्चेनुसार, ही कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडरशी स्थानिक पातळीवर चर्चा करत असून स्थानिक डेटा इथेच स्टोअर करण्याबाबत ही चर्चा होत आहे. मात्र, कोणत्या कंपनीशी याबाबत चर्चा होत आहे, ही माहीती अद्याप समजलेली नाहीये.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, PUBG Mobile कंपनीने भारताच्या हाय प्रोफाईल स्ट्रीमर्सना याबाबतची तयारी करण्यास सांगितले आहे. यानुसार, या वर्षाच्या अखेरीपर्यंत PUBG Mobile पुन्हा एकदा परत येण्याची शक्यता आहे. मात्र, PUBG Mobile ने याबाबतचे ऑफिशियल स्टेटमेंट दिेलेले नाहीये. मात्र, अपेक्षा आहे की, या महिन्याच्या शेवटी दिवाळीच्या दरम्यान PUBG Mobile भारतात पुन्हा येऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.