Chinchwad : जागतिक अपघात पिडीत स्मृती दिनानिमित्त जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज –  रस्ते व रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी चिंचवड प्रवासी संघ व चिंचवड रेल्वे स्थानक कर्मचार्‍याच्या वतीने रेल्वे व रेल्वे मार्गाचे नियमाचे काटेकोर पालक करणार व प्रसंगी अपघात ग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध करुन देण्याबाबत आज जागतिक अपघात पिडीत स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना शपथ देऊन जनजागृती अभियान राबविण्यात आले.

आज रविवार जागतिक अपघात पिडीत स्मृती दिन की, ज्यामध्ये रस्त्यावर मृत पावलेले व गंभीर जखमी झालेले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा दिन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा कायदा 1993 साली स्विकारण्यात आला आणि जागतिक स्तरावर 26 ऑक्टोबर 2005 साली त्याला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून जगात जे लाखो लोक अपघातात मृत पावले किंवा गंभीर जखमी झाले. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
देशभरात आज अपघाताचे प्रमाण वाढत आहे. रस्ते व रेल्वे मार्गावरील अपघातामध्ये जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले तर अनेक गंभीर जखमी झाले. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जागतिक अपघात पिडीत स्मृतीदिन पाळण्यात येतो. रस्ते व पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी स्थानक व आसपास अनेक जण अपघातात मृत्युमुखी पडले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली चिंचवड येथे वाहण्यात आली. जे जखमी झाले त्यांना आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली व रस्ते व रेल्वे मार्गावरील नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत सुरक्षित प्रवास व वाहने चालवू अशा आशयाची एक शपथ चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने रेल्वे कर्मचारी प्रतिक्षा खरात यांनी दिली. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, चिंचवड रेल्वे स्थानकांचे प्रमुख अनिल नायर, अमित वर्मा, प्रवासी संघाचे पदाधिकारी नारायण भोसले, नंदू भोगले, सतीश शिलम, रामभाऊ सुपेकर, ज्ञानेश्वर घुले, डॉ. जावेद शिकलगार, पृथ्वीराज चव्हाण यावेळी उपस्थित होते. तर रेल्वे प्रवासी आण्णा राव, उषा उघडे, मनीषा पिराजाहाते, मंगल होगले, वर्षा होगले, महावीर घोडमिसे, विजय भगत आदी प्रवाशांनी शपथ घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.