Pimpri : पथनाट्यातून मासिक पाळीच्या आरोग्याची जनजागृती

एमपीसी न्यूज- मासिक पाळीभोवतीचा कलंक पुसण्यासह मासिक पाळीचे आरोग्य, स्वच्छता या बद्दल मोकळेपणाने संभाषण या विषयी जनजागृती करणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. शनिवारी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा होत असताना आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम ‘उजास’ने पुण्यात प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण केले.
Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणुक : मित्र पक्षाची ताकद जास्त असेल ती जागा त्यांना मिळावी : अजित पवार
ब्रेकिंग द सायलेन्स : लेट्स नॉर्मलाईज पीरियड्स’ या शीर्षकाचे हे पथनाट्य पिंपरी (Pimpri) व पुणे शहरात सहा ठिकाणी सादर झाले. पिंपरी येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या परिसरात याचा शुभारंभ झाला , महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंसहायता गट, स्वारगेट बस डेपो, जंगली महाराज रस्ता, डी. वाय. पाटील विद्यापीठ अशा विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी, डॉ. आणि विविध घटकांशी संबंधित लोकांनी पथनाट्याचे सादरीकरण अनुभवले.
पथनाट्यांसोबतच, ‘उजास’ने वर्षभर जनजागृतीसाठी भिंतीवरील रंगकाम, दृष्टिहीनांसाठी कार्यशाळा आदी उपक्रम राबवले आहेत. मासिक पाळीच्या आरोग्याचे महत्त्व, योग्य स्वच्छतेच्या पद्धती आणि प्रचलित गैरसमज दूर करून महिला आणि पुरुष दोघांना शिक्षित आणि सक्षम करणे हा पथनाट्याचा उद्देश होता. उजासचा ठाम विश्वास आहे की, अशा प्रभावशाली नाटकांचे आयोजन मासिक पाळीबद्दल खुल्या चर्चेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
पथनाट्याच्या प्रभावाविषयी बोलताना समाजप्रेरक, ‘उजास’च्या संस्थापक अद्वैतेशा बिर्ला म्हणाल्या, “पथनाट्य हृदयाला मोहित करत मन मोकळे करणारी कला प्रकार आहे. समाजाला जागृत करून मुक्तसंवादाला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे. त्यातून याबाबत बदल घडणार आहेत. पथनाट्याद्वारे समाजाला मासिक पाळीच्या बाबतीतील गैरसमज दूर करून मासिक पाळीच्या आरोग्याला जीवनाचा एक नैसर्गिक पैलू म्हणून स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतो.
उजास’ पुणेच्या प्रमुख परवीन शेख म्हणाल्या, “आजवर 2070 मार्गदर्शन सत्रे आयोजिली आहेत. 13 वेगवेगळ्या ठिकाणी 378 शाळांमध्ये 8 लाख 15 हजार 998 सॅनिटरी पॅड वितरित केले आहेत. मासिक पाळीबाबतची अस्पृश्यता, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून खुल्या चर्चेला चालना देण्याची गरज आहे, असा विश्वास ‘उजास’ला वाटतो. या उपक्रमाद्वारे, मासिक पाळीच्या स्वच्छता दिनानिमित्त पुण्यातील व पिंपरीतील (Pimpri) किमान 10 हजार व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना संभाषणात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.
Bhosri : खिशातला मोबाईल घेतला म्हणून तरुणावर जिवघेणा वार