Pune News : राष्ट्रध्वजाचा सन्मानासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जनजागृती

एमपीसी न्यूज – 15 ऑगस्ट व 26 जानेवारी नंतर राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती जनजागृती अभियान राबवत आहे. (Pune News) ही विटंबना रोखण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या विरोधात राष्ट्रकर्तव्य म्हणून प्रबोधन करत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पुणे शहर परिसरात मागील 15 दिवसांपासून मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात आले याला समाजातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

भोर येथील निवासी नायब तहसिलदार मनोहर पाटील यांना निवेदन देण्यात आले, तसेच भोर पोलीस स्टेशन येथे ही निवेदन दिले. ठाणे अंमलदार शिंदे यांनी निवेदन स्विकारले. शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ कार्यालय पुणे मनपा (माध्यमिक) पुणे तसेच शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ कार्यालय पुणे मनपा (प्राथमिक)पुणे यांना निवेदन देण्यात आले. शिक्षण विभाग पुणे म.न.पा.च्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मनीषा राऊत यांनी निवेदन स्वीकारलं.

Pimpri News : नागरिकांशी उद्दामपणे वागणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करा

यामध्ये जिल्हाधिकारी,शाळा,महाविद्यालय येथे निवेदन देऊन प्रबोधन करण्यात आले. आता पर्यंत 80 हून अधिक शाळांमध्ये तसेच 7 महाविद्यायांमध्ये निवेदने देऊन जागृती करण्यात आली. याच समवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे,प्रबोधन कक्ष उभारणे हा भाग करण्यात आला. तसेच फलक द्वारे ही लिखाण करण्यात आले.

सामाजिक संकेतस्थळाद्वारे मोहीम राबवणे आदी कृतींद्वारे जागृती करण्यात आली. पुणे शहरात जिल्हाधिकारी अन्य शासकीय अधिकारी पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग (Pune News) तसेच प्रांत-तालुका स्तरांवर राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा यासाठीचे निवेदन देण्यात आले आणि प्रबोधन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.