Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागरण फेरी

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशाचा दैदिप्यमान इतिहास नागरिकांच्या मनात तेवत रहावा या उद्देशाने केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga)  हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त तळेगाव शहरात सर्वसमावेशक भव्य जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली.
सकाळी (दि.10) रोजी नगर परिषदेच्या कार्यालयापासून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांनी तिरंगा फडकावून घोषणा देत सुरुवात केली.
https://youtu.be/56lUmkyCnAs

यावेळी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, शंकर उरसाळे, विशाल मोरे, वैशाली दाभाडे सह तळेगाव दाभाडे नगर परिषद, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, केंदीय राखीव दल अधिकारी, सर्व शिक्षक, महिला दक्षता समिती सदस्य, संघर्ष अकॅडमी, काव्या पोलिसपूर्व प्रशिक्षण अकॅडमी यांचे विद्यार्थी व सदस्य यांच्या सहभागाने संपूर्ण शहरामध्ये हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या अभियानाविषयी घोषणा देत जनजागृती करत प्रभातफेरी काढण्यात आली.
या प्रभात फेरीच्या नियोजनामध्ये पोलीस नाईक प्रशांत वाबळे, बाबासाहेब मुंडे, रविद्र काळोखे, सिद्धेश्वर महाजन, जयंत मदने आदींनी सहभाग दर्शविला होता. ही प्रभात फेरी संपूर्ण गाव तसेच तळेगाव स्टेशन भागातून घोषणा देत तसेच नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवून या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत पूर्ण झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.