Pune : सार्वजनिक गणेश मंडळांची ऑनलाईन परवाने घेण्यास पसंती

गेल्या 5 दिवसात 65 मंडळांचे अर्ज

एमपीसी न्यूज – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याची प्रक्रिया शनिवार ( दि २० ) पासून सुरू करण्यात अली आहे. गेल्या पाच दिवसात शहरातील ६५ मंडळांनी ऑनलाईन परवान्यानसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मंडळांनी ऑनलाईन परवाने घेण्यास पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 

गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील गणेशोत्सवा दरम्यान ऑनलाईन पद्धतीने स्वरुपात मंडप परवानगी देण्याचे पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने निश्‍चित केले आहे. महापालिकेच्या संकेत स्थळांवर जाऊन ऑनलाईन परवाना घेत येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असून १५ ऑगस्ट पर्यंत हे परवाने घेता येणार आहे.
 गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करत पारंपरिक ऑफलाईन पद्धतीला पसंती दिली होती. त्यामुळे २२०६ मंडळा पैकी फक्त ८४१ मंडळांनी ऑनलाईन परवाना घेतला होता. यंदाच्या वर्षी मात्र सुरुवातीपासूनच मंडळांनी ऑनलाईनला उस्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.