Pimpri: पालिकेतील नेटवर्कींग दुरूस्ती, देखभालीसाठी सव्वाकोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य कार्यालय आणि इतर विविध कार्यालयातील नेटवर्कींगचे दुरूस्ती व देखभालीचे कामकाज करण्यात येणार आहे. तीन वर्षे कालावधीसाठी केल्या जाणा-या या कामकाजासाठी एक कोटी 38 लाख रूपये खर्च होणार आहे.

महापालिका मुख्य कार्यालय आणि इतर विविध कार्यालयांचे नेटवर्कींगचे दुरूस्ती व देखभालीचे कामकाज माहिती – तंत्रज्ञान विभागामार्फत करण्यात आले आहे. त्याकरिता नेमण्यात आलेल्या संस्थेची मुदत 4 जुलै 2018 रोजी संपुष्टात आली आहे. नेटवर्कींग दुरूस्ती व देखभालीसाठी नेटवर्कींग विषयक कामकाजाचा अनुभव असणा-या संस्थेची नेमणूक करण्यासाठी माहिती – तंत्रज्ञान विभागामार्फ ई – निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामकाजासाठी एकूण तीन निविदा धारकांनी ई – टेंडरींग प्रणालीद्वारे निविदा सादर केल्या.

_MPC_DIR_MPU_II

त्यापैकी मेनस्ट्रीम सोल्युशन्स यांचे दर वार्षिक 46 लाख 89 हजार रूपये याप्रमाणे तीन वर्षाकरिता एक कोटी 38 लाख 90 हजार रूपये असे प्राप्त झाले आहेत. हे दर अर्थसंकल्पीय दरापेक्षा 3.80 टक्क्याने कमी आहेत. त्यानुसार, मेनस्ट्रीम सोल्युशन्स यांना महापालिका मुख्य कार्यालय आणि इतर विविध कार्यालयांचे नेटवर्कींगचे दुरूस्ती व देखभालीचे कामकाज देण्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.