Talegaon : मावळ तालुका मनसेचा सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी शेळके यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया, तालुका उपाध्यक्ष योगेश हुलावळे, तालुका सचिव संजय शिंदे, तालुका संघटक संग्राम भानुसघरे, प्रसिद्धीप्रमुख तानाजी तोडकर, आंदर मावळ उपाध्यक्ष संतोष मोंधळे, रस्ते आस्थापना अध्यक्ष अनिल वरघडे, तळेगाव शहराध्यक्ष राहुल मांजरेकर, लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज मोजेस दास, कामशेत शहराध्यक्ष कुणाल पतंगे, वडगाव शहराध्यक्ष गणेश भंगारे तसेच नवनाथ शिवेकर आदी उपस्थित होते.

रुपेश म्हाळसकर म्हणाले की, सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारची समाजोपयोगी कामे झाली. सुनीलआण्णांना पक्षाने न्याय दिला नाही, त्यांना ही जनता धडा शिकवेल आणि सुनीलआण्णांना न्याय मिळवून देईल. सुनीलआण्णा यांचे काम सदैव जनतेपर्यंत पोहचले आहे. त्याचाच फायदा म्हणून येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पदरात मतांच्या रूपाने दान पडणार आहे. आम्ही तुम्हाला विधानसभेत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही.

भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकद कोणत्याच नेत्याला जमा करता आली नाही. ती सुनील शेळके यांनी केली, असे म्हाळसकर म्हणाले.

सुनील शेळके हा कर्णासारखे दातृत्व असलेला नेता आहे आणि एक खरा कार्यकर्ता आहे आणि मनसे ही नेहमीच तालुक्याच्या योग्य नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहणार आहे, असे संजय शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.