Pune : पीआयएलफ’मध्ये ‘विश्वकर्मा’कडून ६० पुस्तकांचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रस्तुत व डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने २० ते २२ सप्टेंबर २०१९ या कालावधीत यशदा येथे होत असलेल्या सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे तब्बल ६० मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच ‘मराठी आज व उद्या’ या विषयावर चर्चासत्र, ख्यातनाम व नवोदित लेखकांशी वाचकांचा थेट संवाद होणार आहे, अशी माहिती विश्वकर्मा पब्लिकेशनच्या संचालिका तृप्ती अगरवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ख्यातनाम लेखक वीरेंदर कपूर, संपादक मनोहर सोनवणे, लेखक संदीप तापकीर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.