Pune News : श्री शंकर महाराज माहात्म्य या 108 ओव्या असलेल्या पोथीचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : गुरुपौर्णिमेनिमित मंगळवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ गोगावले मठमध्ये श्री शंकर महाराज माहात्म्य या 108 ओव्या असलेल्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले. ही पोथी प्रताप अनंत गोगावले यांनी लिहली आहे.  

पोथीचे प्रकाशन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मठातील सेवेकरी सचिन खिवसरा व स्वाती खिवसरा यांचे हस्ते झाले. यावेळी अपर्णा गोगावले,  श्रीधर गोगावले, शीतल गोगावले, समीर वालगुडे, प्रज्ञा वालगुडे ही उपस्थित होते. कार्यक्रम प्रस्तावना मठातील सेवेकरी माधव महाजन यांनी केली.

यावेळी प्रताप गोगावले यांनी पोथी लिहण्यामागील पार्श्वभूमी व या पोथीस अमृत पोथी श्री शंकर महाराज माहात्म्य हे शीर्षक का दिले? हे कथन केले. श्री शंकर महाराज यांचे चरित्र,कार्य व कथा त्यांनी सांगितल्या. तसेच1978 साली श्री शंकर महाराज यांचा त्यांना आलेला अनुभव सांगून श्री स्वामी समर्थ यांच्या शिष्यांच्या पुण्यात असलेल्या समाधी स्थाना बद्दल माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.