Akurdi News : जायंट किलर ठरलेले नगरसेवक अमित गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – जायंट किलर ठरलेले नगरसेवक अमित गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त (19 मार्च) पिंपरी-चिंचवड अंतरंगच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्राधिकरण परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नगरसेवक अमित गावडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणा-या विशेषांकाचे आकुर्डी येथे प्रकाशन झाले.

प्रकाशन सोहळ्यासाठी राजेंद्र गावडे, विजय गावडे, यशवंत करळ, सूर्यकांत मुथीयान, रवींद्र वकील, शामसुंदर परदेशी, चंद्रकांत तेली, सुरेश कारंडे, शरद लुणावत, धुंडिराज ओक, चंद्रशेखर जोशी, दलीचंद सिंघवी, शंकर व्हनकळस आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

‘आपल्या सेवेसी सदैव तत्पर’ हे ब्रीदवाक्य घेऊन नगरसेवक गावडे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांचे ब्रीदवाक्य केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गावडे आणि त्यांच्या टीमने विशेष कष्ट घेतले आहे. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप, कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देणे, आर्थिक दुर्बल असलेल्या रुग्णांच्या बिलामध्ये सवलत मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना हव्या असलेल्या वस्तू घरपोच करणे, अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर फवारणी अशा एक ना अनेक कामांमधून नगरसेवक अमित गावडे यांनी आपल्या कामाची कोरोना काळात चुणूक दाखवून दिली आहे.

हे केवळ कोरोना काळातील काम आहे. इतर वेळी श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि दुर्गेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून नगरसेवक गावडे आपल्या प्रभागात कायम ऍक्टिव्ह राहिले आहेत. परिसरातील राष्ट्रप्रेमी आणि चारित्र्यवान तरुणांचे त्यांनी संघटन केले. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांची ऊर्जा कामी लावली.

नगरसेवक गावडे यांचा प्रभाग उच्चभ्रू लोकवस्तीचा असला तरी त्यात मध्यमवर्गीय कुटुंबे देखील वास्तव्य करीत आहेत. प्रभागातील प्रत्येक घरातील प्रत्येकाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे यासाठी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य गावडे यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

नगरसेवक अमित गावडे म्हणाले, “कोरोना काळात नगरसेवक म्हणून काम करताना ईश्वराने माझी परीक्षा घेतली, अशी माझी धारणा आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरतो आहेस का, हेच कदाचित ईश्वराला या काळात पाहायचे असेल. या परीक्षेत मी माझ्या परीने प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही प्रश्न उत्तर न देता सोडून दिलेला नाही. भविष्यातही सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.