Maval News : स्वयंभू फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून आंदर मावळमध्ये दरवर्षी हजारो दिनदर्शीकांचे वाटप केले जाते. या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले जातात. फाउंडेशनच्या या वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले.

स्वयंभू फाउंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वयंभू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, तळेगाव नगर परिषेदेचे माजी नगरसेवक संदिप (नाना) शेळके,टाकवे गावचे माजी सरपंच अनिल मालपोटे, हभप धोंडीबा महाराज घोजगे, माजी चेअरमन नारायण मालपोटे, ह.भ.प. माऊली महाराज ठाकर, आंदर मावळ राष्ट्रवादी वि.काँ.उपाध्यक्ष वैभव पिंगळे, आं.मा.सो.मि.अध्यक्ष तानाजी पिंगळे, अमोल पडवळ,शाम पवार,दिपक पडवळ,वैभव कार्ले,अमोल वाळूंज उपस्थित होते.

माजी सरपंच दत्तात्रय  पडवळ व स्वयंभू फाऊंडेशन मावळ यांच्या पुढाकारातुन हा उपक्रम घेतला जातो. पडवळ हे मागील दोन वर्षे  आंदर मावळामध्ये 15000 दिनदर्शीकेचे वाटप करत असतात. व आंदर मावळातील प्रत्येक गाव, वाड्या-वस्त्या मधील प्रत्येक घरांमध्ये स्वयंभू फाऊंडेशनचे सदस्य स्वतः जाऊन दिनदर्शीका देण्याचे काम करत असतात.

पडवळ हे या दिनदर्शीकेतून प्रत्येक घरात पर्यँत देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.