PUC News : पीयूसी नसेल तर होईल दहा हजारांचा दंड; निगराणीसाठी पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्यांचाही होणारा वापर

एमपीसी न्यूज – पीयूसी संपलेले वाहन चालवत असाल तर सावधान… शासनाने नवीन प्रणाली विकसित केली असून या अंतर्गत पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्याद्वारे वाहनांवर निगराणी ठेवून पीयूसी संपलेल्या वाहनांवर तब्बल दहा हजारांचा दंड आकारला (PUC News ) जाणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पॉल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी) नसेल तर दहा हजारांच्या दंडाची तरतूद आहे. अनेकजण पीयूसी संपल्यानंतर देखील तशीच वाहने चालवणे पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे शासनाने अशा वाहनांवर निगराणी ठेवण्यासाठी नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्यानंतर पीयूसी संपलेल्या वाहनांना तब्बल दहा हजारांचा दंड आकारला जाणार(PUC News)आहे.

Chinchwad : होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडीट करा, आमदार जगताप, माजी विरोधी पक्षनेते काटे यांची मागणी

या वाहनांवर निगराणी ठेवण्यासाठी पेट्रोल पंपावर कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे संबंधित वाहनांचे फोटो काढून ते कंट्रोल रूमकडे पाठवले जातील. तिथे संबंधित वाहनाची पीयूसी संपली आहे अथवा नाही याबाबत खातरजमा केली जाईल. पीयूसी संपले असल्यास तात्काळ दंड आकारला जाईल.तसेच, त्याबाबतचा मेसेज वाहन मालकाच्या मोबाईलवर तात्काळ येईल अशी प्रणाली विकसित केली आहे.

भारत देशातील केरळ राज्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली  असून राज्यभरात 726 कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जात आहे. त्यानंतर हा उपक्रम पुणे शहरात देखील सुरू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.