Puen : येरवड्यात पूर्ववैमनस्यातून तलवारीचे वार करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून काही हल्लेखोरांनी एका तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ सयाजीनाथ महाराज विसर्जन घाटासमोर घडली. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला.

निहाल ऊर्फ गंड्या जनार्दन लोंढे ( वय19 रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे मृत युवकाचे नाव असून राहुल सतीश कांबळे (वय 23, राहणार लक्ष्मीनगर येरवडा ) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी निहालचे वडील जनार्दन लोंढे (वय 38, रा. येरवडा ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल  व त्याचा मित्र राहुल हे दोघे निहालच्या मावशीकडून 20 रुपये घेऊन तसेच फिर्यादीचे जावई नागेश कांबळे यांची मोटारसायकल घेऊन बाहेर गेले होते. रात्री साडेनऊ पर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी फिर्यादी व त्यांचे जावई नागेश कांबळे रात्री पावणेअकराच्या सुमारास बाहेर पडले.

निहालचा शोध घेत असताना, सादलबाबा दर्ग्याकडून येरवड्याकडे येणा-या रस्यावर तीन-चार अनोळखी इसमांनी निहाल व त्याचा मित्र राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला करुन निहालचा खून केला तर राहुलला गंभीररित्या जखमी केल्याचे समोर आले. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.