Pune : दाभोळकर हत्याप्रकरणी पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी ऍड संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. ऍड संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर पुणे सत्र न्यायालायात सुनावणी घेण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. पुनाळेकर यांच्यावर दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. ते सनातन संस्थेचे वकील असून या प्रकरणातील आरोपींची बाजू ते न्यायालयात मांडत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.