-MPC-TOP-MOST-BANNER-I

Punavale : बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये 25 डिसेंबरला बेमिश ख्रिसमस कार्निवल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- पुनावळे येथील बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूल आणि 18 लॅटिट्युड मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बेमिश ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत 18 लॅटिट्युड मॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

या कार्निव्हलमध्ये मनोरंजक खेळ, बौद्धिक खेळ, नृत्य, चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे ‘जॉय ऑफ गिविंग’ उपक्रमांतर्गत सहभागी होणारे नागरिक पुस्तके, कपडे, खेळणी अशा वस्तू उपेक्षित बालकांसाठी भेट देऊ शकतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 23 डिसेंबर पर्यंत 9689021122 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन संयोजक रोहन जोशी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.