Punavale Crime News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या कारणांवरून होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2011 ते सात जुलै 2021 या कालावधीत पुनावळे येथे घडला.

किरण संदीप पाटील (वय 36) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने मंगळवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पती संदीप कांतीलाल पाटील (वय 40), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय 56) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मयत किरण पाटील यांना तिच्या वर्णावरून आरोपींनी वारंवार हिणवले. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून किरण यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सासरच्या चार जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.