Punavale: येथे कचरा डेपो सुरु करु नये – मयुर कलाटे

कचरा डेपो सुरु करण्यास स्थानिकांचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे राज्य सरकारच्या वनविभागाच्या जागेत कचरा डेपो सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कचरा डेपो सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे येथे कचरा डेपो सुरू करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात नगरसेवक कलाटे म्हणाले, पुनावळे परिसरातील रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारीच हिंजवडी आयटी पार्क आहे. येथे कचरा डेपो केल्यास या भागातील विकासावर त्या अनुषंगाने शहराच्या विकासावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.

  • शहरातील प्रत्येक वार्डात त्या-त्या भागातील कचरा तेथेच जिरविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. महापालिकेने तसा निर्णय घ्यावा. परंतु, पुनावळे येथे कचरा डेपो करू नये. त्यास स्थानिक रहिवाशांकडून विरोध केला जाईल, असे कलाटे यांनी निवेदनातून म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.