Punawale : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या (Punawale) कार चालकाला कार दुसऱ्या बाजूने आणण्यास सांगितल्याने पेट्रोल पंपावरील कामगाराला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 3) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास साई पेट्रोल पंप पुनावळे येथे घडली.

अविनाश नानासाहेब शिंदे (वय 23, रा. चिंचवड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/पीक्यू 8544 या क्रमांकाच्या कारचालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : ब्रँडेडच्या नावाखाली नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साई पेट्रोल पंप पुनावळे येथे मीटर (Punawale) कॅशियर म्हणून काम करतात. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले. त्यांना त्यांची कार दुसऱ्या बाजूने आणा असे फिर्यादींनी सांगितले. त्यावरून आरोपी पेट्रोल पंपावरून निघून गेले. आरोपींनी काही वेळानंतर पुन्हा पेट्रोल पंपावर येऊन फिर्यादी यांना बोलावून घेत त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.