Punawale : कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी पुनावळे येथे घंटानाद आंदोलन

एमपीसी न्यूज – पुनावळे येथे होऊ घातलेल्या घनकचरा व्यवस्थापन ( Punawale)  प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे. यासाठी पुनावळे परिसरातील नागरिकांनी रविवारी (दि. 3) घंटानाद आंदोलन केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे वनविभागाची जमीन घेऊन त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे योजले आहे. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये जंगल आहे. नैसर्गिक परिसंस्था नष्ट करून या ठिकाणी हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे इथली नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊन प्रदूषणात वाढ होईल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

Assembly Election Result : छत्तीसगडमध्ये भाजपा व काँग्रेस प्रत्येकी 44 जागांवर

तसेच या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. होऊ घातलेला हा प्रकल्प शहराच्या पश्चिम दिशेला आहे. वाऱ्याची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. त्यामुळे या प्रकल्पातून निघणारा धूर अथवा वायू हा शहराच्या बहुतांश भागात पसरेल आणि त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळेल. अशा विविध कारणांमुळे स्थानिक नागरिकांकडून पुनावळे येथे होऊ घातलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शवला जात आहे.
याबाबत पुणावळे परिसरातील नागरिकांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. तसेच प्रशासनाशी पत्रव्यवहार करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली जात आहे. रविवारी सकाळी कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी घंटानाद आंदोलन केले. ‘रद्द करा रद्द करा, कचरा डेपो रद्द करा’ अशा घोषणा देत नागरिकांनी आंदोलन ( Punawale)  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.