Punawale News: पत्नी व दोन मुलासह जात असताना कारचा अपघात; पत्नीचा मृत्यू, मुले जखमी

एमपीसी न्यूज – पत्नी व दोन मुलासह कारमधून जात असताना रस्त्यात अचानक थांबलेल्या कंटेनरला कार धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात पत्नीचा मृत्यूचा झाला तर दोन मुले व त्यांचे चालक वडील हे जखमी झाले आहेत. बंगळूरू- पुणे हायवे, पुनावळे येथे सोमवारी (दि.28) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात घडला.

प्रज्ञा कैलास उपरे असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती कैलास तुळशीराम उपरे (वय 35, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास हे आपली पत्नी प्रज्ञा व दोन मुले यांच्यासह कार मधून जात होते. त्यावेळी बंगळूरू- पुणे हायवे, पुनावळे येथे अचानक एक कंटेनर रस्त्यात थांबला. फिर्यादी यांच्या कारने या कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, फिर्यादी व त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.