Punawale News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वैकुंठरथाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – स्वर्गीय राजाभाऊ दर्शिले युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना नगरसेविका रेखा दर्शिले यांच्या माध्यमातून तयार केलेल्या वैकुंठरथाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पुनावळेतील माळवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका अश्विनी वाघमारे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, लक्ष्मण मोहिते, हनुमंत माळी, संतोष पवार, विजय दर्शिले, नितीन दर्शिले आदी उपस्थित होते.

पुनावळे गावठाणात स्मशानभूमी आहे. माळवाडी, पुनावळे आजूबाजूच्या परिसरातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृतदेह नेण्यास लांब पडत होते. स्मशानभूमी लांब होती. नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांची सोय व्हावी, यासाठी नगरसेविका रेखा दर्शिले, विजय दर्शिले, नितीन दर्शिले यांच्या माध्यमातून स्वर्गीय राजाभाऊ दर्शिले युवा प्रतिष्ठान आणि श्री नाथ महस्कोबा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा रथ तयार करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

खासदार श्रीरंग बारणे, ”राजाभाऊ दर्शिले या भागातील कट्टर शिवसैनिक होते. दुर्दैवाने अपघाताने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रेखाताई दर्शिले या नगरसेविका म्हणून या भागाचे उत्तम नेृतत्व करत आहेत. त्या अबोल असल्या तरी या परिसरात चांगल्या पद्धतीने काम करतात. काम करताना शासकीय, राजकीय पातळीवर असंख्य अडचणी येतात. परंतु, खचून न जाता. त्यावर मात करुन त्यांनी गेल्या चार वर्षात ताथवडे, पुनावळे या भागाचा विकास करण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने त्या काम करतात”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.