BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 
प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट यांनी बुधवारी रात्री आपली मोटार संतनगर, मोशी येथे पार्क केली होती. चोरट्यांनी मध्यरात्री मोटारीची काच फोडून आतील 12 हजार रुपयांचा कारटेप चोरून नेला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस हवालदार भोरकडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3