HB_TOPHP_A_

Pune : चोरीच्या संशयावरून तरुणाला विजेचा शॉक देणा-या पोलीस कर्मचा-याचा जामीन फेटाळला

223

एमपीसी न्यूज – चोरीच्या संशयावरून तरुणाला अमानुष मारहाण करत विजेचा शॉक दिला. तसेच त्याच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान बुधवारी (दि. 5) पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला.

HB_POST_INPOST_R_A

रमेश गबाजी नाळे (वय 56, रा.सिंहगडरोड, धायरी) व राजू त्र्यंबक केदारी (वय 49, रा.कावेरीनगर, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत.

नाळे व त्याच्या सहका-यांना मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाकडे चौकशी करुन बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला होता. चौकशीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नाही. त्यामुळे नाळे यांनी तरुणाकडून ८ लाख रुपये खंडणी घेऊन त्याला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.

नाळे याने केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नव्हती. तरुणाच्या नातेवाईकांनी वकिलांमार्फत पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे दाद मगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून दोघांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. दोघांनी पुणे सत्र न्ययालयात जामीन अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने त्याचा जमीनअर्ज फेटाळल्याची माहिती फिर्यादी यांचे वकील बिलाल शेख यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: