BNR-HDR-TOP-Mobile

PUNE : जनता वसाहत येथे दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून

पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जनता वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुन्हेगारांच्या दोन टोळ्यात कोयते आणि दगडाने भीषण हाणामारी झाली. यामध्ये सराईत गुंड निलेश उर्फ निल्या वाडकर याची डोक्यात दगड घालून नीघृण हत्या करण्यात आली. तर तिघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..यावेळी बिट मार्शल दिलीप पिलाणे व गणेश शिंदे या दोघांनी घटनास्थळावरून पळून जाताना दोघांना पकडले.

निलेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात तो आरोपी होता. काही दिवसांपुर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. रविवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला.वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी निलेश वाडकरवर सह गणेश यादव, अमोल कदम , सुजित वदंबे , या चौघांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यामध्ये वाडकरचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी घटना स्थळांवरून पळ काढणाऱ्यादोन संशयितांना ताब्यात घेतलं असून इतर १० ते १२ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. गेल्या काही दिवसांपासुन या परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. दोन गटामध्ये वेळावेळी होणा-या वादामुळेच निलेश वाडकरचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3