BNR-HDR-TOP-Mobile

Pune – पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर ससूनमध्ये उपचार सुरु

762
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. 1७) पहाटे साडेचारच्या सुमारास मंगळवार पेठ येथील शाहीर अमर शेख चौक येथून शिवाजीनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर घडली आहे.

याप्रकरणी साहिल अशोक रजपुत (वय 21,रा. मंगळवार पेठ) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी साहिल आणि त्याचा मित्र लक्ष्मण मोरे हे रात्री उशिरा डेक्कन येथे नाश्ता करून त्यांच्या आणखी एका मित्राला घेऊन शाहीर अमर चौकाकडून शिवाजीनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवरून जात होते.

दरम्यान, त्यांच्या समोरून ट्रक आल्याने त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर चारजण त्यांच्याजवळ आले. फिर्यादी साहिलचे त्यांच्यासोबत पूर्वी काही कारणांमुळे वाद झाले होते. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी साहिलवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी साहिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास फरासखाना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सी. एस. लोहकरे हे करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.