BNR-HDR-TOP-Mobile

Pune: प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी मूळव्याध तपासणी महाशिबीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताकदिनानिमित्त पुणेकरांना मूळव्याधीपासून मुक्तकरण्याचे ध्येय शिवाजीनगर येथील अथर्व हॉस्पिटलचे डॉ. संदीप अगरवाल यांनी ठेवले आहे. त्यासाठी 26 ते 31 जानेवारी या कालावधीत मूळव्याध तपासणीचे मोफत महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

मूळव्याध तपासणीमध्ये ज्यांना पुढच्या शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यांना त्या खर्चात सवलत दिली जाणार आहे. बायोलॉजिकल इलेक्ट्रिक इम्पेडन्स ऑटो मेझरमेंट तंत्रज्ञानाने सध्या मूळव्याधीवरील उपचार अगदी सोपा झालेला आहे. त्याच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया बिन टाक्यांची, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता 10 ते 15 मिनिटांत केली जाते. त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही.

या दुर्धर आजारापासून सहजसोप्या तरीही प्रभावी उपचार पद्धतीने मुक्तता मिळवता येते. जास्तीत जास्त रुग्णांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे अहवान डॉ. संदीप अगरवाल यांनी केले. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणार्‍या रुग्णांनी 020-25535757 या क्रमांकावर नावनोंदणी केली जात आहे.

HB_POST_END_FTR-A4

.