Pune : सिपोरेक्स ब्लॉक्स’ माध्यमातील कलाकृती रसिकांच्या भेटीस 

एमपीसी न्यूज – शिल्पकलेपेक्षा तुलनेने नवे असलेले सिपोरेक्स ब्लॉक्सचे माध्यम कलाकार गिरीश मुरूडकर यांनी कल्पकतेने वापरले असून त्यांच्या कलाकृतींचा समावेश ‘सावली’ या सामूहिक कला प्रदर्शनात करण्यात आला आहे.
आर्ट फाऊंडेशन आयोजित हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे १ ते ३ जून २०२३ पर्यंत रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. तेथे या कलाकृती कलाकारांच्या सामूहिक प्रदर्श ठेवण्यात येणार आहे.

सिपोरेक्सच्या सिमेन्टब्लॉक्स कोरून पगडया, छोटा जिरेटोप, वृन्दावन, गणपती, अशा अनेक आर्ट पीस मुरुडकर यांनी केले असून ते या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटासाठी तयार केलेल्या पेशवे पगडीची प्रतिकृती देखील मांडण्यात येणार आहे.
हेक्सा ब्लेड, करवत, पॉलिश पेपर, खिळा, साल काढण्याची सुरी सोलाणे,कापण्याची सुरी अशा सोप्या घरगुती अवजाराच्या वापरातून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. ही अवजारेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. मुरुडकर यांच्यासह सुमारे ३० कलाकारांची कलाकृती, चित्रेही या प्रदर्शनात असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.