Pune : भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे गुरुवारी संस्कृत एकांकिकांचा ‌‘नाट्यानुकीर्तनम्‌‍’ महोत्सव

पुणे : दुर्मीळ आणि काहीशा दुर्लक्षित होत चाललेल्या संस्कृत या प्राचीन भाषेला पुनरुजिवित करण्यासाठी पुण्यातील (Pune)  भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेने ‌‘नाट्यानुकीर्तनम्‌‍’ हा तीन संस्कृत एकांकिकांचा महोत्सव आयोजित केला आहे.

एकांकिकांचा महोत्सव दि. 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिरात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे दिली.

Kishore Aware : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आवारे कुटुंबियांचे सांत्वन

संस्कृत भाषा देववाणी म्हणून संबोधली जाते. ती सर्व भाषांच्या जननीबरोबरच अनेकविध शास्त्रांचे भांडार देखील आहे. विपुल वाङ्मयाचे वैभव लाभूनही काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. देवधर्म, पोथ्या-पुराणापर्यंतच तिला सीमित केले गेले. कोणत्याही भाषेला पुनरुजिवित करायचे असेल तर नाट्यकलेसारखे जनमानसात पोहोचणारे दुसरे उत्तम माध्यम नाही.

मराठी नाट्यसंस्कृतीची जननी असलेल्या संस्कृत नाटकांना प्रोत्साहन देण्यास ाठी डॉ. रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळूनही त्यात सादर होणाऱ्या एकांकिका केवळ त्या स्पर्धेतील एका प्रयोगापुरत्याच मर्यादित राहतात. म्हणूनच स्पर्धेच्याही पलिकडे जाण्याचा दृष्टिकोन मिळावा या विचाराने प्रेरित होऊन आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर भरत नाट्य संशोधन मंदिराने हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाला प्रवेशमूल्य आहे.

या महोत्सवात भरत नाट्य मंदिरनिर्मित ‌‘सहवासिन्य:’, स. प. महाविद्यालय निर्मित ‌‘संगीत सौभद्र’ आणि महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेती, फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त पुणे निर्मित ‌‘यावच्चन्द्रदिवाकरौ’ या तीन एकांकिका रसिकांना पहायला मिळणार आहेत.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये (Pune) यापूर्वी अशा प्रकारचा संस्कृत नाटकांचा महोत्सव आयोजित केला गेलेला नव्हता. ‌‘नाट्यनुकीर्तनम्‌‍’ या महोत्सवामुळे जवळपास 50 संस्कृत आणि नाट्यप्रेमी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये सादर होणाऱ्या तीनही एकांकिका रोजच्या व्यवहारातील विषय हाताळणाऱ्या व अत्यंत सुलभ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या असल्यामुळे जास्तीत जास्त रसिकांपर्यंत संस्कृत भाषा पोहचू शकेल, असे रवींद्र खरे यांनी सांगितले.

Pune : डी मार्टजवळ झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.