pune : युती नाही झाली तर रावसाहेब दानवे यांचा पराभव होईल; संजय काकडेंची भविष्यवाणी

भाजपला घरचा आहेर, दानवे यांच्या मतदारसंघात काकडे यांचा सर्व्हे

एमपीसी न्यूज – शिवसेनेसोबत युती नाही झाली तरीही भाजपचे राज्यात ४० खासदार निवडून येतील, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना आता भाजपमधूनच घरचा आहेर मिळाला आहे.

भाजपचे सहयोगी सदस्य असणाऱ्या संजय काकडे यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे. जर शिवसेना आणि भाजपची युती नाही झाली तर रावसाहेब दानवे यांचा दीड लाख मतांनी पराभव होईल, अशी भविष्यवाणी काकडे यांनी केली आहे.

यावेळी काकडे म्हणाले, रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात माझा चांगला संपर्क आहे. त्यांच्या मतदारसंघात मी सर्व्हे केला असून त्यामध्ये दानवे यांची जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. जवळपास दीड लाख मतांनी त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे..

पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर काकडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजावर मी नाराज नाही. पण पक्षातील काही लोकांच्या कामकाजावर मी नाराज आहे. पण, असे असले तरी मी पक्ष सोडून जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.