Pune: महिनाभरात पुणे विमानतळावरुन 1.13 लाख प्रवाशांची वाहतूक

Pune: 1.13 lakh passengers transported to Pune Airport in a month या कालावधीत 618 विमाने पुण्यात आली आणि 618 विमानांनी पुण्यातून उड्डाण केले.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद होती. एक महिन्यांपूर्वी केंद्राने देशांतर्गत विमानसेवेला हिरवा कंदील दिला. या महिन्याभराच्या कालावधीत पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन आतापर्यंत सुमारे 1.13 प्रवाशांनी प्रवास केला आहे. महिनाभरात 1236 विमानांच्या फेऱ्या झाल्याचे विमानतळावरील नोंदीवरुन दिसून येते.

नागरी हवाई उड्डयण मंत्रालयाने 25 मेपासून देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी दिली होती. नवी दिल्लीहून आलेले विमान 25 मे रोजी पुणे विमानतळावर लँड झाले होते.

पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर 25 मे ते 24 जून या कालावधीत 1236 विमानांच्या फेऱ्या झाल्या. 1,13,026 प्रवाशांची वाहतूक या विमान फेऱ्यामधून झाली. या काळात प्रवाशांचे सहकार्य लाभले. आम्ही ही फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड बाबतच्या इतर दक्षता विमानतळावर घेतल्या.

कुलदीप सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, या कालावधीत 618 विमाने पुण्यात आली आणि 618 विमानांनी पुण्यातून उड्डाण केले. 41530 प्रवासी पुण्यात आले आणि 71496 प्रवासी पुण्यातून दुसऱ्या राज्यात गेले. ही सेवा सुरळित राहण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक दल आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.