_MPC_DIR_MPU_III

Pune : विक्रीसाठी आणलेला 11 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करून दीड लाखांचा गांजा खंडणी विरोधी पथकाकडून संगमवाडी परिसराततून आज मंगळवारी (दि.18) जप्त करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV

अर्जुन नाना तिमिले (वय 21, रा. दोडाईचा,धुळे), आणि कोमलसिंग जयसिंग रजपूत (वय 30,रा .सुसदे, नंदुरबार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना दोघेजण पाटील इस्टेट झोपडपट्टी कडून संगमवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला दोघेजण एका भागासह संशयितरित्या त्या परिसरात फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून बॅगची झडती घेतली असता त्यात गांजासारखा पदार्थ दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांचा नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्याची उत्तरे देखील व्यवस्थित दिली नाही. त्यानंतर पंचासमोर त्यांची चौकशी करून बॅगची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत 10 किलो 800 ग्रॅम वजनाचा तब्बल 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा मिळाला.

पोलिसांनी तो गांजा जप्त करून दोघांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.