Pune : पुणे विभागात 1 लाख 83 हजार 821 कोरोना बाधित

विभागातील 1 लाख 30 हजार 987 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 83 हजार 821 झाली आहे. विभागातील 1 लाख 30 हजार 987 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 47 हजार 949 इतकी आहे.

कोरोना बाधीत एकुण 4 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.3 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

गुरुवारी (दि. 20) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 70 हजार 657 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 83 हजार 821 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या  रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 331 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 544, सातारा जिल्ह्यात 396, सोलापूर जिल्ह्यात 376, सांगली जिल्ह्यात 276 तर कोल्हापूर जिल्ह्यात 739 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 35 हजार 837 रुग्णांपैकी 1 लाख 2 हजार 851 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 29 हजार 765 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.72 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 671 रुग्णांपैकी 4 हजार 918 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 476 आहे. कोरोनाबाधित एकूण 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 849 रुग्णांपैकी 10 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 638 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 585 रुग्णांपैकी 3 हजार 886 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 435 आहे. कोरोनाबाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 879 रुग्णांपैकी 9 हजार 117 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 277 आहे. कोरोनाबाधित एकूण 485 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.