Pune : फेसबुकवर मैत्री करून वृद्धाची सव्वा 1 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फेसबुकवर मैत्री करून आई आजारी असल्याचे कारण सांगत एका वृद्धाची तब्बल 1 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मे 2018 पासून ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी नवी सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या एका 72 वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या एका 72 वर्षीय वृद्धाशी एका चंद्रशेखर नावाच्या फेसबुकवरील व्यक्तीने संपर्क साधला आणि ओळख केली. त्याने फिर्यादी यांच्याशी मोबाईलवर आणि मेसेजवर त्याची आई आजारी असल्याचे सांगितले आणि त्यांना बँक खात्यावर वेळोवेळी तब्बल 1 लाख 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु त्या व्यक्तीने फिर्यादी यांना फक्त पाचशे रुपये परत करून त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर नावाच्या इसमावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.