Pune : विभागात 1 हजार 702 जणांना कोरोनाची लागण; 264 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 झाली आहे. विभागातील 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 344 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 538 झाली आहे. 230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 223 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 हजार 747 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 908 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15 हजार 151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 702 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजपर्यंत विभागामधील 59 लाख 91 हजार 999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 29 लाख 48 हजार 395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

विभागातील कोरोना बधितांची संख्या (मृत्यू झालेल्यांची संख्या) 

पुणे – 1538 (85)
सातारा – 41 (2)
सोलापूर – 81 (6)
सांगली – 30 (1)
कोल्हापूर – 12 (0)
एकूण – 1702 (94)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.