Pune: ससून रुग्णालयात कोरोनाचा 1 बळी, आतापर्यंत 103 जणांना डिस्चार्ज

Pune: 1 victim of corona at Sassoon Hospita todayl, 103 discharged so far

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे आज (गुरुवारी) पुणे शहरातील ससून रुग्णालयात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 98 जणांचा मृत्यू झाला असून, 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

नाना पेठेतील 70 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला होता. या महिलेला कोरोना व्यतिरिक्त निमोनिया, हृदयाचा विकार असेही आजार होते. कोरोनामुळे 50 ते 80 या वयोगटातील जेष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामध्ये मधुमेह, किडनी विकार आणि इतर जोखमीचे आजार असलेल्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्हयातील 3 हजार 352 बाधीत रुग्ण असून 1 हजार 533  कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण  178  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. मागील काही दिवसांपासून रोज कोरोनाचे 100 रुग्ण आढळून येत आहेत.

प्रशासनातर्फे रोज 1500 ते 1600 कोरोनाचा चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांतील 5 वार्डात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा चाचण्या करण्यात येत आहे. दि. 17 मे पर्यंत या भागांत 100 टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत. नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचीही मदत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.