Pune : दहावी रंगूनवाला ‘सेव्हन -ए-साईड’ फुटबॉल स्पर्धा सोमवारी

हॉटेल इंडस्ट्रीतील 12 संघांचा सहभाग

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम ए रंगूनवाला इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’तर्फे एम. ए. रंगूनवाला ‘सेव्हन -ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आझम कॅम्पस मैदानावर उद्घाटन सोहळा होणार आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरोजित बोस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट संस्था आणि हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्रीतील १२ संघांचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.