Pune : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

केंद्र सरकारतर्फे आर्थिक दुर्बल सवर्ण यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण

एमपीसी न्यूज –  पुणे केंद्र सरकारतर्फे आर्थिक दुर्बल सवर्ण यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने स्वागत केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ आयोजित पुणे येथे कालराज मिश्रा व केंद्रीय मंत्री वेणुगोपालाचार्य यांच्या उपस्थितीत दि. 26 ऑक्टोबर 2018मध्ये विविध राष्ट्रीय ब्राम्हण संघटनांच्या पदाधिकारी संमेलनामध्ये झालेल्या विषयाला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आल्याचे कालराज मिश्रा यांनी सांगितले. सर्व समाजाला समान न्याय देण्याच्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.

त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, खासदार अमर साबळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, शेखर चरेगावकर यांचेही अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने अभिनंदन केले.यानिमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर नागरी सत्कार करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.