Pune : नऱ्हे येथे गॅरेजच्या 10 वाहनांना लागली आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

एमपीसी न्यूज : नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो (Pune) गॅरेज मधील 10 वाहनांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही जळालेल्या वाहनांमध्ये 4 चारचाकी वाहने तर 6 दुचाकींचा समावेश आहे.

Pimpri : कविसंमेलन आणि प्रबोधनपर कार्यक्रमांनी संविधान दिन साजरा

यामध्ये 5 ते 7 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे नुकसान करण्यात आले आहे. यावरून ही आग कोणत्यातरी व्यक्तीने लावण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

https://youtu.be/TAvbOQ4ZWVg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.