Pune : पुणे : क्राफ्ट पेपरमधून कलाकारांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची 100 फूट मोठी प्रतिमा

एमपीसी न्यूज : राज्याभिषेक सोहळ्याच्या 349 व्या वर्धापन दिनानिमित्त (Pune) हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये शहरातील कलाकार उद्देश पघल आणि रुतुजा घुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 100 फूट मोठी प्रतिमा तयार केली. 

राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि महानगरपालिकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुंदर प्रतिमा 50000 (पन्नास हजार) क्राफ्ट पेपर वापरून तयार करण्यात आली असून ती पूर्ण करण्यासाठी दोन्ही कलाकारांना सुमारे 12 तास लागले, अशी माहिती रुपेश तुपे यांनी दिली.

शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला. प्रतिमा तयार करण्यासाठी 4 इंच बाय 4 इंच आकाराचे क्राफ्ट (Pune) पेपर वापरले गेले. कागदाचा वापर करून बनवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली भव्य प्रतिमा पुण्यातील नागरिकांना हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये गुरुवार, 8 जूनपर्यंत पाहता येणार आहे.

Pimpri Chinchwad RTO : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन घ्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.