Pune : खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणांत 100 टक्के पाणीसाठा ; सायंकाळी सात वाजता 2 हजार क्युसेकने विसर्ग

नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. : 100 per cent water storage in Panshet dam following Khadakwas; Discharged by 2,000 cusecs at seven in the evening

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणांतही 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून आज, सोमवारी सायंकाळी 7 वाजता 2 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरल्याने मुठा नदीपात्रात केला जाणारा विसर्ग आता 9 हजार 416 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

खडकवासला धरणात 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेतमध्ये 10.52 टीएमसी (98.82 टक्के), वरसगावमध्ये 10.81 टीएमसी (84.29 टक्के), टेमघरमध्ये 2.51 टीएमसी (67.81 टक्के) असा चारही धरणांत 25.82 टीएमसी म्हणजेच 88.57 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच कालावधीत या धरणांत 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. आता सुद्धा ही चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पुणेकरांच्या दोन वेळच्या पाणीपुरवठया सोबतच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला आहे. पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.