Pune : खडकवासला 100 टक्के भरले; धरणावर ‘जलपूजन’ !

खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. : 100 percent filled in Khadakwasla; 'Jal Pujan' on the dam!

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने त्याचे जलपूजन करण्यात आले.

याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, पाठबंधारे विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मागील काही दिवसांत धरण क्षेत्रात कमी पाणीसाठा असल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुणेकरांना दिलासा दिला होता.

गणेशोत्सव संपेपर्यंत पाणीकपात होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या या चारही धरणांत तब्बल 21.07 टीएमसी म्हणजेच 72.30 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच कालावधीत 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. ही धरणे भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. आजही धरणांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लवकरच धरणे भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 70 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.