Pune : बारावीच्या परीक्षेत ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज’मध्ये साईन सैफ मुजफ्फर प्रथम

‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’चा निकाल 80.18 टक्के

एमपीसी न्यूज- बारावीच्या परीक्षेत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज’चा निकाल 80.18 टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेच्या साईन सैफ मुजफ्फर याने 94.92 टक्के मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला, तर वाणिज्य शाखेचा शेख झामीन तन्वीर याने 84 टक्के, कला शाखेमध्ये अन्सारी आएशा रहेमतुल्लाह हिने 71.84 टक्के मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या परवीन झेड. शेख यांनी दिली.

‘एम.सी.ई सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.