Pune : विविध राज्यातून 11,000 परप्रांतीय पुणे शहरात दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील विद्यार्थी, मजूर आणि विविध क्षेत्रात काम करणारे कामगार पुणे शहर सोडून आपापल्या मूळ गावी परत गेले होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर तसेच हळूहळू गोष्टी पुन्हा सुरु होऊ लागल्यानंतर विविध राज्यातून जवळपास 11,000 परप्रांतीय पुणे शहरात दाखल आहेत.

रेल्वे प्रवास करून हे कामगार पुणे शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, शहरात आलेले हे प्रवासी बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि दाक्षिणात्य राज्यातील आहेत.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रमुख राजेंद्र सरग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही लोकांना 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले आहे. तसेच काही जणांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले आहे.

ज्या लोकांना कोरोना संबंधित लक्षणे आढळून आली आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.