Pune : 1142 नागरिक कोरोनामुक्त, 1177 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू

शहरात सध्या 750 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 467 जण व्हेंटिलेटरवर आहेत. ; 1142 civilian corona free, 1177 new patients, 27 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहारत कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी तब्बल 1142 नागरिक कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या 5 हजार 673 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1177 नवे रुग्ण आढळले. 27 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 750 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 467 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 71 हजार 503 रुग्ण झाले आहेत. 55 हजार 100 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 683 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 720 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 50 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 62 वर्षीय पुरुषाचा, आंबेगाव बुद्रुकमधील 35 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 73 वर्षीय पुरुषाचा, औंधमधील 78 वर्षीय पुरुषाचा, बावधनमधील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, खडकीतील 84 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शिवाजीनगरमधील 59 वर्षीय पुरुषाचा संजीवन हॉस्पिटलमध्ये, नारायण पेठेतील 53 वर्षीय महिलेचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 75 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, हिंगणे खुर्दमधील 65 वर्षीय पुरुषाचा संचेती हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 59 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोथरूडमधील 70 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, गणपतनगरमधील 75 वर्षीय महिलेचा, सदाशिव पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 82 वर्षीय पुरुषाचा, कसबा पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, बावधनमधील 69 वर्षीय पुरुषाचा, धायरीतील 34 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 64 वर्षीय महिलेचा, कर्वेरोडवरील 67 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

गोखले रोडवरील 58 वर्षीय महिलेचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीतील 75 वर्षीय महिलेचा, धानोरीतील 47 वर्षीय महिलेचा, मंगळवार पेठेतील 51 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 50 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा एन. एम. वाडियामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.