Pune: पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1153 जणांचा मृत्यू, एकूण मृत्युदर 2.45 टक्के

Pune: 1153 deaths due to corona in Pune, total death rate 2.45 percent ज्या रुग्णांना लठ्ठपणा, मधुमेह, किडनी, हृदयविकार असे अनेक आजार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असताना मृत्युदर हा 2.45 टक्के आहे. दि. 25 जुलैपर्यंत एकूण 47 हजार 65 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 27 हजार 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्ण 18 हजार 494 इतकी असून, 1 हजार 153 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहेत.

ज्या रुग्णांना लठ्ठपणा, मधुमेह, किडनी, हृदयविकार असे अनेक आजार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सध्या लॉकडाऊन संपल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दि. 31 जुलैपर्यंत शहरात 27 हजार सक्रिय रुग्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे नियोजन सुरू आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे या रोगातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.

त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. तर, काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ही 58.26 टक्के इतकी आहे. शहरात 39.29 टक्के सक्रिय रूग्ण आहेत.

पुण्याची तुलना करता मुंबईतील मृत्यूदर हा 5.59 टक्के इतका आहे. तो पुण्यापेक्षा दुप्पट आहे. मात्र, तेथील कोरोनामुक्तीची टक्केवारीही जास्त आहे. ती 72.99 टक्के असून, सक्रिय रुग्ण संख्या ही पुण्यापेक्षा सुमारे 10 टक्क्यांनी कमी आहे. पुणे शहरात रोज कोरोनाच्या 7 हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यामध्ये 1800 ते 2 हजार रुग्ण आढळून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.