Pune : 1156 रुग्ण कोरोनामुक्त, 1 हजार 91 नवे रुग्ण, 35 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 737 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 448 जण व्हेंटिलेटरवर आहेत. : 1156 patients coronary free, 1 thousand 91 new patients, 35 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज गुरुवारी शहरातील 1156 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या 6 हजार 335 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 91 नवे रुग्ण आढळले. तर 35 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 737 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 448 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 70 हजार 326 रुग्ण झाले आहेत. 53 हजार 958 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 656 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 712 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 77 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, पांडवनगर मधील 80 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 24 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 64 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 63 वर्षीय पुरुषाचा, पद्मावतीमधील 55 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 45 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 50 वर्षीय पुरुषाचा, बावधनमधील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

चंदननगरमधील 63 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, रविवार पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा, बालाजीनगरमधील 64 वर्षीय पुरुषाचा, लोहगावमधील 54 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, पाषाणमधील 52 वर्षीय महिलेचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, औंध रोडवरील 62 वर्षीय पुरुषाचा डी. एच. औंधमध्ये मृत्यू झाला.

सिंहगड रोडवरील 47 वर्षीय पुरुषाचा, शंकरनगरमधील 72 वर्षीय पुरुषाचा, घोरपडी पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा, पद्मावतीमधील 93 वर्षीय पुरुषाचा, सोमवार पेठेतील 69 वर्षीय पुरुषाचा, आनंदनगरमधील 61 वर्षीय महिलेचा, शुक्रवार पेठेतील 66 वर्षीय महिलेचा, शिवाजीनगरमधील 87 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 81 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शिवाजीनगरमधील 60 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, चंदननगरमधील 53 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 86 वर्षीय महिलेचा पुणे ॲडवेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये, सहकारनगरमधील 33 वर्षीय पुरुषाचा सना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

घोरपडीतील 43 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 68 वर्षीय महिलेचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 47 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 55 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 50 वर्षीय महिलेचा श्री हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 70 वर्षीय पुरुषाचा लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.