Pune : 1168 नागरिक कोरोनामुक्त, 1224 नवे रुग्ण, 29 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 760 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 463 जण व्हेंटिलेटरवर आहेत. : 1168 civilians coronated, 1224 new patients, 29 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी तब्बल 1168 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 5 हजार 947 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1224 नवे रुग्ण आढळले. 29 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 760 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 463 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 76 हजार 157 रुग्ण झाले आहेत. 59 हजार 874 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 814 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 469 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 52 वर्षीय पुरुषाचा, मुकुंद नगरमधील 84 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 56 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 46, 75 आणि 35 वर्षीय पुरुषाचा, विश्रांतवाडीतील 60 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 63 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पुलावरील 63 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 43 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 58 वर्षीय महिलेचा पुणे ॲडवेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 81 वर्षीय पुरुषाचा, धायरीतील 83 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 63 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, रास्ता पेठेतील 75 वर्षीय महिलेचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, वडगावमधील 65 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 66 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 50 वर्षीय पुरुषाचा औरा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढवा खुर्दमधील 65 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, शंकरनगरमधील 85 वर्षीय पुरुषाचा, भवानी पेठेतील 61 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 73 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 71 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 65 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

मंगळवार पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, शिवदर्शनमधील 34 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 54 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बावधनमधील 62 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.