Pune : 1196 रुग्णांची ‘कोरोना’वर मात, 1440 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू

कोरोनामुळे एकूण 1 हजार 456 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. : 1196 patients overcome ‘corona’, 1440 new patients, 27 deaths

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आजारावर 1196 रुग्णांनी आज, गुरुवारी मात केली. शहरात एकूण 5 हजार 208 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1440 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला. शहरात सध्या 16 हजार 975 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये 674 क्रिटिकल रुग्ण उपचार घेत असून, त्यात 425 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनाचे पुणे शहरात 62 हजार 37 रुग्ण झाले आहेत. 43 हजार 606 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे एकूण 1 हजार 456 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

फतिमानगरमधील 72 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 62 वर्षीय पुरुषाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

दांडेकर पुलावरील 62 वर्षीय पुरुषाचा, एरंडवणेतील 57 वर्षीय पुरुषाचा आणि 47 वर्षीय महिलेचा, दत्तवाडीतील 56 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 69 वर्षीय महिलेचा, कात्रजमधील 54 वर्षीय महिलेचा, कर्वेनगरमधील 66 वर्षीय पुरुषाचा, बुधवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा, कसबा पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा, बावधनमधील 54 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 65 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 73 वर्षीय महिलेचा, नानापेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा, औंधमधील 62 वर्षीय पुरुषाचा, पाषाणमधील 71 वर्षीय महिलेचा, मंगळवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

गुलटेकडीतील 70 वर्षीय महिलेचा, शनिवार पेठेतील 64 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 56 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 77 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 77 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, पौड रोडवरील 88 आणि 72 वर्षीय महिलेचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, रेंज हिल्समधील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.